धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा पत्रकार संघ संलग्न असलेल्या धाराशिव तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख व सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये तालुकाध्यक्षपदी मच्छिंद्र कदम, उपाध्यक्ष सुधीर पवार, सचिव शितलकुमार वाघमारे, कोषाध्यक्ष किशोर माळी यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणीत सदस्य म्हणून आकाश नरोटे, शिवराजसिंह गव्हाणे, संजय शिंदे, राजवर्धन भुसारे, हेदरअली पटेल, प्रशांत सोनटक्के, शुक्राचार्य शेलार, विशाल जगदाळे, ईर्शाद मुलाणी तर जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून प्रशांत कावरे, हुकमत मुलाणी, अमर शेख यांची निवड करण्यात आली. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी धाराशिव तालुका पत्रकार संघ नेहमीच अग्रेसर असतो. या नुतन कार्यकारणीच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.