तुळजापूर (प्रतिनिधी)- जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानीजधाम यांच्या संकल्पनेतून भारतीय जवान व सर्व सामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन उपजिल्हयारुग्णालयात याचे उदघाटन भाजयुमोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे धैर्यशील दरेकर, दिनेश क्षिरसागर, नरेंद्र महाराज संस्थान तालुकाध्यक्ष दीपक मुळे, जिल्हा कर्नल शंकर कांबळे, अजय भोसले, राधा गिरी, वनिता गायकवाड, दशरथ उत्तरवाड सह शिष्यगण मोठ्या संखेने उपस्थितीत होते.