तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर ते मोर्डा,धारूर डांबरी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता की मृत्यूचा सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. जीवघेण्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सबसे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या काही वर्षापासून या रस्त्याची साधी डागडुजी सुधा करण्यात आली नाही. रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ते हा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. सुमारे ८ किलोमीटरच्या या रस्त्यावर सतत वर्दळ असते. यातील दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, प्रवाशी व वाहनचालकांना हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे.
सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत़ एवढेच नव्हे तर वाढत्या वाहनांची गर्दी व पडलेल्या खड्ड्यांमुळे आपघाताच प्रमाण वाढले आहे.विद्यमान आमदार ,खासदार ,लोकप्रतिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्त्याची डाकलोजी करावी किंवा कोणास डांबरी रस्ता तयार करावा अशी प्रवाशातून मागणी होत आहे.