धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये सन 2020 मध्ये स्थापन झालेल्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलने वर्ष 2024 मध्ये अतिशय सुंदर अशी कामगिरी बजावत एआयसीटीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मेंटर मेंटी स्कीममध्ये बेस्ट मेटी अवार्ड मिळवले आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परंपरेनुसार नियमित महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप या विषयावर विविध कार्यक्रमांचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हे नियोजन करत असताना पुण्यातील एमआयटी एडीटी यूनिवर्सिटी ही महाविद्यालयाची मार्गदर्शक संस्था ही सहभागी आहे. त्यांच्या वतीने प्रा. डॉ. सुरज भोयर व डॉ. राकेश सिद्धेश्वर, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे यांनी विविध उपक्रम राबवण्यास सर्वतोपरी सहकार्य केले. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे सन 2024 मध्ये नवीन उद्योजकता, स्किल डेव्हलपमेंट, नाविन्यपूर्वक विचार पद्धती या विषयावर आधारित अनेक सेमिनार ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये 300 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यांनी या माहितीचा लाभ घेऊन नवीन कल्पनांचे रूपांतर प्रकल्पात करून अविष्कार, स्मार्ट इंडिया हेकाथॉन व महाराष्ट्र इनोव्हेशन चॅलेंज यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. तसेच पेटंट, जॉग्रफिक इंडिकेशन्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट यावर माहिती देणारी इम्पॅक्ट लेक्चर सिरीज देखील महाविद्यालयामध्ये आयोजित इस्टूड इनोव्हेशन कौन्सिल यांच्या माध्यमातून आयोजित केली. देवदूत गुंतवणूक, व्हेंचर कॅपिटल म्हणजेच स्टार्टअप आणि लहान व्यवसायिकांसाठीची गुंतवणूक, आणि उद्योजकता या विषयासंदर्भात देखील माहिती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्त्यामार्फत देण्यात आली. नाविन्यपूर्वक असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबवण्यात आल्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत, मेंटर मेन्टी इन्स्टिट्यूट संलग्न बेस्ट मेन्टी अवॉर्ड हा तेरणा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, उस्मानाबादला एमआयटी एडीटी, युनिव्हर्सिटी, पुणे यांच्याकडून प्रदान करण्यात आला.
या महाविद्यालयाच्या यशामुळे तेरणा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. विक्रमसिंह माने, डॉ.सुशीलकुमार होळंबे (आय आय सी कन्व्हेनर), डॉ. पी. टी. माने, डॉ. आर. बी. ननवरे, प्रा. यु. जे. जाधव, प्रा. डी. एच. निंबाळकर, प्रा. ए. आर. देशपांडे, प्रा. ए. के. पिंपळे, प्रा. के. सी. मुळे, प्रा. डी. बी. ठाकूर, प्रा. एम. डी. पाटील, प्रा. डी. बी. भक्ते, प्रा. ऋतुजा काळे, अजिंक्य काळे, डॉ. शैलजा पाटील, आशिष मोदानी व व्ही. डी. पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन हा सन्मान प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, मल्हार पाटील, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी विशेष अभिनंदन करून इनोव्हेशन इन्स्टिट्यूट कौन्सिलच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.