कळंब (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती जिल्हा धाराशिव यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक 19 जानेवारी 2025 वार रविवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कॉलेजमध्ये 11 वाजता संपन्न होणार आहे .
धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षण तज्ञ एम.डी देशमुख सर, कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचे हस्ते प्रधान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती मुंबईचे कार्यवाहक सुनील पुजारी , धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. गिरीश द. कुलकर्णी, अ.भा.कथा माला समितीची चे कोषाअध्यक्ष मुंबई के.व्ही गाजरे , शि.म .ज्ञा मो. महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.सुनील पवार , उपशिक्षणाधिकारी धाराशिव दत्तात्रय लांडगे, कळंब पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते, अध्यक्ष मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघ बी .आर पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ सचिव प्रभाकर कापसे, धाराशिव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ह. भ. प महादेव महाराज अडसूळ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .प्रत्येक तालुक्यातील एक गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापक यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी ,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. अशोक मोहेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर अनंतराव सूर्यवंशी यांना कै. डी. के. कुलकर्णी सर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात संपन्न होणार आहे. या पुरस्कर सोहळ्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साने गुरुजी कथामाला समितीचे धाराशिव जिल्हा व कळंब तालुक्यातील पदाधिकारी यांनी केले आहे.