कळंब (प्रतिनिधी)- येथील शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये चौथ्या दिवशी  राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास या विषयावर विषयावर आयोजित बौद्धिक वर्गात प्रा. डॉ. कमलाकर जाधव यांनी व्याख्यान दिले.  व्याख्यानामध्ये मत मांडत असताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये कृतिशीलपणे सहभागी होतात. आपल्या अंगी असलेले विविध कलागुणांचे कौशल्याचे सादरीकरण करतात. यातून स्वतःचे व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे घडून येते. राष्ट्रीय सेवा योजना हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. राघवेंद्र ताटीपामूल यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन प्रा. समाधान चंदनशिव यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. पल्लवी उंदरे,प्रा. संदीप महाजन स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सायक ग्रंथपाल अरविंद शिंदे, अधीक्षक हनुमंत जाधव,अर्जुन वाघमारे व बंडगर उपस्थित होते.


 
Top