धाराशिव (प्रतिनिधी)- दिशा समितीच्या अशासकीय सदस्य पदी माजी नगरसेवक तथा माजी डीपीसी सदस्य सिद्धार्थ बनसोडे यांची निवड झाली ही निवड खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुचविल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्याच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती मिळाल्याबद्दल फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पा समोर पुष्पहार व पेढे भरून सत्कार करण्यात आला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.शुभेच्छा देतांना रवि सुरवसे,रवि कोरे, राजेंद्र धावारे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे, गणेश वाघमारे,संजय गजधने,बलभीम कांबळे,प्रवीण जगताप,संपतराव शिंदे, सचिन दिलपाक,स्वराज जानराव,अतुल लष्करे,यांच्यासह इतर अन्य उपस्थित होते सिद्धार्थ बनसोडे यांनी सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.