धाराशिव (प्रतिनिधी) - डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र राज्य मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्या सूचनेनुसार सध्या महाविद्यालयामध्ये" वाचन संकल्प महाराष्ट्राचा " हा उपक्रम 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये दररोज महाविद्यालयामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अंतर्गत सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. त्या अनुषंगाने सध्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले यांची जयंती वाचन दिवस म्हणून साजरा करण्यात आली. यावेळी ग्रंथालयामध्ये घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते प्रथम सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर आलेल्या विविध वर्तमानपत्रांमधील लेखावरील संकलन करून त्याचे विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले. व सावित्रीबाई फुले यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला. लोकतसेच विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या सर्व लेखाचे रसग्रहण करून थोडक्यात सारांश मांडला. यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनीता गुंजाळ,डॉ उषा वडणे ,प्रा वर्षा पाटील , सविता नलावडे, सूक्ष्ममा टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सामूहिक वाचनामुळे व सध्या महाविद्यालयात चालू असलेल्या उपक्रमामुळे वाचनाची गोडी लागली असून भविष्यात वाचन करणे खूप गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रियेत नमूद केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.