तुळजापूर (प्रतिनिधी) - आपसिंग्याच्या भूमीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या धगधगत्या क्रांतीची पार्श्वभूमी आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेकांनी प्राणाची आहुती दिली असे प्रतिपादन डॉ. सतीश कदम यांनी केले. नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडल संचलित नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपसिंगा ता. तुळजापूर येथे केले.
यावेळी ते बोलताना म्हणाले, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळाचा सिंहाचा वाटा असून, ज्या काळात 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते' या देहाने प्रेरित होवून विद्यार्थ्यांचा अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न होता. तेव्हा वसतिगृह स्थापन करून शिक्षणासारखे पवित्र कार्य या संस्थेने केले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही संस्था स्वखर्चाने कठीण प्रसंगी वसतिगृह सुरू ठेवून हजारो विद्यार्थी घडविले. पुढे ते म्हणाले की, आपसिंग्याच्या भूमीला मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या धगधगत्या क्रांतीची पार्श्वभूमी आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात आपसिंगा गावातील अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून मराठवाडा मुक्त करण्यात योगदान दिले. यावेळी क्रांतिकारी श्रीधर वर्तक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी सरपंच अजित क्षीरसागर, उपसरपंच राहुल साठे, शिवाजीराव सांजेकर, उमेश भोसले, शंकर गोरे, विनय भोसले, कल्याण तोडकरी, मंदार रोहिणकर, श्रीमती. ज्योती सांजेकर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम गोरे व प्रकाश मगर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.