तुळजापूर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे सर मिञपरिवार वतीने मकर संक्रांति निमित्त पापनाश व विवेकानंद मधील महिलांसाठी हाँटेल स्काँयलँन्ड येथे आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रमास मोठा प्रतिसाद लाभला.
त्यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, प्रियांका विजय गंगणे व अर्चना शेषकुमार रोचकरी यांच्या हस्ते 350 महिलांना स्वयंपाक घरात लागणारे साहित्य कुकर भेट देण्यात आले. प्रहर्ष बरुळकर, ताती कदम, भारतराव चौधरी, आकाश माने, अश्रू माने, उत्कर्ष डोंगरे, दादा दळवी, विलास रेणके, अभिजीत रेणके, बापू वैरागे, डी. के. कदम, खानदेश वाघमारे तसेच पापनास नगर भजनी मंडख, रहिवाशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन विजय गंगणे मित्रपरिवारच्या वतीने करण्यात आले होते.