भूम (प्रतिनिधी)- गणेश जयंती निमित्त दि 1 फेब्रुवारी रोजी समर्थ नगर येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री विघ्नहर्ता गणेश मंदीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदा उत्सवाचे चौथे वर्ष असून,  दि. 31 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता  पाठसांगवी ता. भूम येथील भजनी मंडळ यांचे भजन होईल. दि 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 वेळेत श्री च्या मुर्तीस महाअभिषेक व  महापुजा होईल. यानंतर सकाळी 8 ते 9  या वेळेत  वेदशास्त्र संपन्न राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत सामुदायिक हवण होईल. यानंतर हभप सागर महाराज कोल्हे बार्शी यांचे वारकरी संप्रदाय यांचे 10 ते 12 या वेळेत किर्तन होवुन पुष्पवृष्टी करुन गणेश जयंती सोहळा होणार आहे. यानंतर महा नैवद्य आरती होवुन दुपारी एक ते चार महाप्रसाद होईल. यानंतर सायंकाळी श्री ची पालखीतुन मिरवणुक समर्थ नगर भागात होवुन आरती होवुन गणेश जयंती सोहळ्याची सांगता होईल. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समिती  यांनी केले आहे.  दि 1 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते नउ या वेळेत सामुदाईक गणेश हवण होत आहे ज्यांना होमाला बसायचे आहे त्यांनी राजाभाऊ धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.

 
Top