नळदुर्ग (प्रतिनिधी) सोलापुर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपास रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नळदुर्गकरांची जीवघेणे अपघात व वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीपासुन सुटका होण्यास मदत मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हा बायपास रस्ता वाहतुकीसाठी खुला करतांना म्हटले आहे.
दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सोलापुर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपास रस्ता आमदार राणा जगजितसिंह पाटील व नागरीकांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी वाहन चालक व सियुसी कंपनीच्या अभियंत्याचा आमदार राणा जगजितसिहं पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे राज्य कार्यकारीणी सदस्य नितीन काळे,सुशांत भुमकर,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी उपनगारध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी नगरसेवक बसवराज धरणे,शफीभाई शेख,निरंजन राठोड, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष विलास राठोड,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार,माजी नगरसेविका छमाबाई राठोड, शहर भाजप अध्यक्ष धीमाजी घुगे,माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके,पांडुरंग पुदाले, अक्षय भोई,अणदुरचे दीपक घोडके, दत्ता राजमाने,शिंदे गटाचे शहर प्रमुख शिवाजी सुरवसे, मनोज मिश्रा, भाजपचे संजय विठ्ठल जाधव, नाना काजी यांच्यासह भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नळदुर्ग येथे आल्यानंतर त्यांना गेल्या दहा वर्षांपासुन रखडत पडलेल्या सोलापुर - हैद्राबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासंदर्भात माहिती देण्यात आली होती त्यावेळी ना. गडकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सुचना देऊन हे काम लवकर पुर्ण करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने या कामाला वेग आला आणि आज हा नळदुर्ग बायपास रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आहे. हा बायपास रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने आता नळदुर्गकरांची वाहतुक कोंडी पासुन सुटका होणार आहे. त्याचबरोबर गेल्या कांही दिवसात या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवितहानी झाली आहे आता यालाही आळा बसणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीत रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षात देशात मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेचे काम करण्यात आले आहे. आपल्या संपुर्ण जिल्ह्यात नॅशनल हायवेचे नेटवर्क झाले आहे आणि आजही होत आहे. नळदुर्ग बायपास रस्ता लवकरच पुर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सुशांत भुमकर नागरीकांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी नाना काजी यांनीही आमदार पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी गोलाई ते मुर्टा पाटीपर्यंतच्या नळदुर्ग बायपास रस्त्याची पाहणी केली.