तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या नगरीत महिलांच्या गळ्यातील सोने दागिने हिसकावुन नेण्याच्या घटनेत वाढ झाल्याने मक्रर संक्रांत निमित्ताने हळदी कुंक साठी बाहेर पडणाऱ्या महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शहारांसारखे प्रकार तिर्थक्षेत्री घडू लागल्यामुळे शहरातील महिला व भाविक महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा दोन घटना आजपर्यत घडल्या आहेत.
गुरुवार दि.16 जानेवारी रोजी बोबल्या चौकात सकाळी 9.30 वाजता भाजी घेवुन घराकडे जाणा-या महिलेच्या गळ्यातील चेन नंबर प्लेट नसलेले व तोंडाला रुमाल बांधलेले दोन तरुन प्रथम गाडीवरुन पाठलाग करीत येवुन गाडी वळवुन महिलेच्या गळ्यातील सोने चैन हिसकावली. माञ चैन खाली पडली व यातील तुकडा मात्र चोरटे घेवुन फरार झाले. सदरील घाबरलेल्या महिलीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजते. सदरील संशियतांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या दोन घटनेमुळे शहरातील महिला वर्गात घबराहट व भितीचे वातावरण सणासुदी काळत निर्माण झाले आहे.
शहरात महिलांच्या गळ्यातील चैन हिसकावुन नेण्याच्या घटने बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी पो. नि. रविंद्र खांडेकर यांना भेटुन शहरात सुरक्षावाढवण्याची मागणी केली. यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर म्हणाले की, विना नंबर प्लेट तोंडावर रुमाल बांधुन फिरणा-या दुचाकी चालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.बुधवारी रात्री घटने प्रकरणी एका संशियताची ओळख पटली आहे. यांचे लोकशन ट्रेस केले आहे. या प्रकरणी एक संशियत गाडी ताब्यात घेतल्याचे सांगितले. शहरात बंदोबस्त वाढवला असुन मी स्वतः हा रस्त्यावर बंदोबस्त करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले.