धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात मकर संक्रांत सणानिमित्त सालाबादप्रमाणे आदर्श परिवाराच्या वतीने  मकर संक्रांत महोत्सव - 2025 आयोजित खेळ पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमाखात संपन्न झाला. प्रथम क्रमांकाच्या मानकरी माधुरी शितल ऐवळे, द्वितीय क्रमांकाच्या मानकरी सुरेखा पवार, तृतीय क्रमांकाच्या मानकरी सायली गंभीरे यांनी पैठणीच्या बक्षिसाचा बहुमान मिळाला.

गेल्या पाच वर्षापासून आदर्श परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  या परिवाराच्या अध्यक्षा प्रेमाताई सुधीर पाटील व मंजुळा आदित्य पाटील तसेच आदर्श परिवारातील सर्व महिला कर्मचारी सदस्य यांच्या कल्पनेतून व परिश्रमातून यावर्षीचा मकर संक्रात महोत्सव 2025 मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या मध्ये खेळ पैठणीचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम झी मराठी कारभारी लय भारी मधील आमदार रजनी जगताप यांची भूमिका साकारणाऱ्या, तसेच उत्कृष्ट निवेदिका पुरस्कार प्राप्त नाट्यकलाकार  नीता देव खिस्ते यांनी आपल्या खुमासदार ग्रामीण भाषा शैलीतून उपस्थित महिला रसिकांचे मनोरंजन केले.  विनोद, चारोळ्या, उखाणे, गाणी, बौद्धिक व मनोरंजनात्मक खेळातून प्रेक्षकांची मने जिंकली.  या प्रसंगी अर्चनाताई पाटील, शुभांगी कैलास घाडगे पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई देशमुख, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे प्रशासकीय अधिकारी  साहेबराव देशमुख, उर्मिलाताई देशमुख उपस्थित होते.

तसेच आदर्श परिवारातील सर्व महिला सदस्य, संस्थेतील पदाधिकारी, मोठ्या संख्येने आदर्श परिवारावर प्रेम करणाऱ्या धाराशिव नगरीतील 4 हजार महिला उपस्थित होत्या. या मनोरंजनात्मक खेळा बरोबरच हळदी कुंकूचा मानही त्यांनी घेतला. तसेच संगीत रजनी या कार्यक्रमातून संगीत विशारद महेश पाटील यांनी आपल्या सुमधुर आवाजातून बहारदार गीतांचे सादरीकरण केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डी.व्ही. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य  पाटील यांचे नियोजन, प्राचार्य नंदकुमार ननवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, खमीतकर बंधू यांची ध्वनी प्रणाली, शेरखाने बंधू यांनी केलेली मंडप सजावट, व्यवस्थापन स्वप्निल पाटील, राम मुंडे छायाचित्रीकरण शिवाजी भोसले  व शिक्षकेतर, कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामुळे आदर्श परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

 
Top