धाराशिव (प्रतिनिधी)-फक्त पुस्तकापुरते शिक्षण न देता पुस्तकाबाहेरील जग विद्यार्थ्यांना दाखवण्याच्या दृष्टीने एकलव्य विद्या संकुलात पार पडत असलेल्या उपक्रमांतर्गत एकलव्य प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेल्या 61 विद्यार्थ्यांचे देवकुरुळी परिसरात अतिशय समृद्धतेने बहरत असणाऱ्या श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेकच्या गुळ पावडर निर्मिती कारखान्यास भेट दिली. या भेटीत 42 मुले, 19 मुली आणि पाच शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते.
भेटीच्या सुरुवातीस श्री.दिनेश कुलकर्णी यांनी कारखाना निर्मितीचा उद्देश सांगितला. तसेच फॅक्टरीमध्ये ऊस आणल्यापासून ते प्रत्यक्ष उत्पादने तयार होईपर्यंत कोणकोणत्या टप्प्यातून जातो कोणत्या टप्प्यावर उसावर कोणती क्रिया होते याची अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती विद्यार्थ्यांना दिले.
त्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान उसाची गव्हाण हार्वेस्टरद्वारे कापलेल्या ऊसाला उतरून घेण्याची नवीन पद्धत तसेच शुगर ज्युस वर कोण कोणत्या रसायनांचा कशाप्रकारे परिणाम होतो. याचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी नेऊन माहिती दिली. त्यानंतर स्टेनलेस स्टीलचा वापर सेंट्रीफ्यूज मशीनच्या वापराने गुळ पावडर आणि मोलॅसेस कसे वेगळे होते हे पाहिले. प्रत्यक्ष तयार झालेल्या ताजी गुळ पावडर खाण्याचाही विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. तदनंतर पाणी पुनर्वापर यंत्रना उकळत्या पाण्याला थंड करण्याची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे विद्युत निर्मिती कशी होते याची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहून माहिती घेतली. शेवटी श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेकच्या ऑफिस समोर त्यांच्या असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. ही क्षेत्र भेट यशस्वी होण्यासाठी श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी प्रत्यक्ष फॅक्टरी मधील मॅनेजमेंट केमिस्ट आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य झाले. मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक भडंगे, शेंडगे सर, घुगे,देवकर आणि सुजाताताई गणवीर यांनी ही क्षेत्र भेट यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.