तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मंदीर जिर्णोध्दार करुन त्यास पुरातन गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी श्रीतुळजाभवानी मंदीरा संस्थान अंतर्गत मंदीर परिसरातील विविध विकास कामे चालु आहेत. या अंतर्गत श्रीगोमुख तिर्थकुंडाला पुरातन रुप आणण्याचे काम चालु असताना 1988 पासुन बंद असलेला श्रीगोमुख तिर्थकुंडातील जिवंत पाण्याचा झरा खुला झाल्याने श्रीगोमुखातुन नैसर्गिक पाण्याचा अखंड झरा चोवीस तास वाहत आहे. श्रीगोमुख तिर्थकुंडात तिर्थक्षेञ काशी येथील गंगेचे पविञ जल येत असल्याचे पुरातन आख्यायिका आहे.
श्रीगोमुख येथील पाण्याने भाविक हात पाय धुवुन डोक्यावर शिंपडून मगच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ जातात. त्यामुळे येथील जल पविञ मानतात. माञ 1988 ला मंदीरात विकास कामे करताना हा नैसर्गिक पाण्याचा झरा हळुहळु बंद झाल्याने नवीन अर्धा इंची पाईप मधुन श्रीगोमुखात पाणी आणुन सोडुन मंदीर समितीने भाविकांची सोय केली होती.
आता श्रीतुळजाभवानी मंदीर जिर्णोध्दार काम सुरु झाले असुन त्या अंतर्गत मंदीराला पुरातन रुप मिळावे यासाठी श्रीगोमुख तिर्थकुंडाचे जिर्णोध्दार काम सुरु केले आहे. हे काम एस साईप्रेम कंस्ट्रकशन काँन्ट्रँक्टर मुकेश जाधव यांना मिळाले. अभियंता सुरज जाधव यांच्या मार्गदर्शन खाली साईट मँनेजर अमोल सुरवसे यांच्या देखरेख खाली झारखंड जिल्हा गिल्डी येथील कामगार अजय महेतो व त्यांच्या सहकाऱ्यांनी छन्नीने दगडी भिंत वरील वरचा भाग तसेच पाण्याने आलेले शेवाळे काम सुरु केले असता श्रीगोमुख वरचा बाजुला छन्नीने मारत असताना अचानक पाणी येण्यास आरंभ झाले. हे पाणी थांबता थांबेना. नंतर त्यांनी अधिक खाणले असता एक ते सवा इंच होल दिसुन आले. आजु बाजुचे क्षार मुळे साचलेला थर काढला व पाण्याचा जिवंत झरा अखंडीत गोमुखात जावुन तेथुन खाली पाणी पडू लागले. हे होल श्रीगोमुख वरचा बाजुला तंतोतंत असल्याने पाणी थेट गोमुखात पोहचते. सध्या अर्धा इंच नैसर्गिक पाणी अखंड वाहत आहे. हे गोमुख शिल्प प्रचंड मन मोहक असुन त्यावरील थर काढल्यानंतर येथे सुंदर रुप नजरेस आले. हे काम छन्नीने करण्यास आठ ते दहा दिवस लागले. हे काम अतिशय जोखमीचे असल्याने शांतपणे प्रशिक्षित कारागीर करीत आहे.