धाराशिव -
शहरातील समता नगरमधील गणेशविसर्जन विहिर ते सुधीर पाटील यांचे घरापर्यंत रस्त्याचे काम रखडले आहे. हे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अन्यथा याच रस्त्यावर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदन समता गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन संतोष घाटगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
शहरातील नाईकवाडीनगर, समता नगरमधील विसर्जन विहिर ते सुधीर पाटील यांचे घरापर्यंत रस्त्याचे काम मंजूर होवून प्रत्यक्षात कामकाज सुरू झालेले होते. परंतु संबंधीत ठेकेदाराने हे काम बंद केल्यामुळे वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता रहदारीचा असल्याने हजारोच्या संख्येने वाहने ये-जा करतात. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागातील अनेक रहिवाशांना धुळीमुळे श्वसनाचा भयंकर त्रास होत आहे. तरी संबंधीत ठेकेदारास रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा रखडलेल्या रस्त्यावर 15 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा समता गृहनिर्माण सोसायटी चेअरमन संतोष (नाना) घाटगे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर विक्रम इंगळे, आयुब शेख, सुधीर जगदाळे, इक्राम सय्यद, विठ्ठल खिचडे, शेषेराव टेकाळे, बिभीषण माळी, हरिदास लोमटे, गणेश आचार्य, मीर काझी, व्ही. एच. वेदपाठक व इतर सदस्यांची स्वाक्षरी आहे.