धाराशिव (प्रतिनिधी)-  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने आवाज उठविणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासह काही लोकप्रतिनिधी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमेला मंगळवारी परळी येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. या घटनेचा धाराशिव येथील मराठा बांधवांनी निषेध नोंदवून जरांगे पाटील, आमदार सुरेश धस यांच्या फोटोंना दुग्धाभिषेक घालण्यात आला.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, ऑल इंडिया पँथरचे सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे सात्याने आवाज उठवित आहेत. मराठा समाज बांधवांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जरांगे पाटील, धस, क्षीरसागर, आव्हाड, सोनवणे, अंजली दमानिया, दीपक केदार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणला. 


 
Top