धाराशिव (प्रतिनिधी)- दोन व्यक्तींनी दुचाकीवर येवून एका महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याची घटना धाराशिवमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात दि. 16 जानेवारी रोजी घडली.
शहरातील रामकृष्ण कॉलनीत राहणारे पृथ्वीराज माने पत्नीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ आली असता विना क्रमांकाची एफझेड कंपनीच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी पृथ्वीराज माने यांच्या पत्नीच्या गळ्यातील 15 ग्रॅम 990 मिली वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे किंमत 60 हजार रूपये हिसकावून पसार झाले. पृथ्वीराज माने यांनी दि.16 जानेवारी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.