उमरगा, (प्रतिनिधी)- तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी येथे पूज्य भदंत धम्मसार थेरो यांच्या संयोजनातून रविवार (दि.12) रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला मुख्य अतिथी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो आहेत या धम्म परिषदेमध्ये भदंत डॉ यशपायन महाथेरो, भदंत धम्मनाग महाथेरो, भदंत पैयातिस्स महाथेरो,
भदंत महाविरोथेरो, भदंत पैय्यानंदथेरो,भदंत धम्मशीलथेरो, भदंत धम्मवीरीवोथेरो,भदंत नागसेनबोधी व पंचवीस भिकू संघ उपस्थित राहून धम्मदेशना देणार आहेत. या धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिमान्यू पवार, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर,बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे,रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव प्रा युवराज धसवडीकर,रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते वसंतराव कांबळे मुंबई,सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त रमेश चक्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या स्वागतअध्यक्ष पदी उपसरपंच युवराज गायकवाड हे आहेत. या धम्म परिषदेत सुमित गायकवाड प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गायिका सुनिता ताई गायकवाड,प्रज्ञाताई गायकवाड या करणार आहेत. या धम्म परिषदेला सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक-उपाशीकानी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भदंत धम्मसार थेरो यांनी केले आहे.