भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रोपदी मुरूमूं सारख्या एका दलित अल्पसंख्यांक महिलेला संधी दिलेली आहे, यापुढेही याच पक्षाकडून दलितांना न्याय मिळणार आहे ही भावना समोर ठेवून आदिवासी दलित पारधी समाजातील तब्बल 28 युवकांनी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे , या पक्ष प्रवेशामुळे शहरात पक्षाला मोठी बळकटी मिळाली आहे.
गुरुवार दि . 9 जानेवारी 2024 रोजी भाजप पक्ष कार्यालयात आगामी नगर परिषद निवडणूक आणि भाजपची सदस्य नोदणी मोहिम या विषयावर भूम, परंडा, वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत रणनिती, पक्ष बांधणी व विचार मंथन सुरू असताना भूम शहराच्या आदिवाशी पारधी पिढीतील 28 युवकांनी एकाचवेळी समुदायाने येवून भाजप पक्षाचे सदस्यत्व स्विकरत सदस्य नोंदणी करत पक्षात जाहिर प्रवेश केला.
हभप बन्सी अरुण काळे महाराज, फुलचंद वसंत काळे, कृष्णा अरुण काळे, रामा शिंदे महाराज, शंभू संजय काळे, दता तानाजी काळे, तानाजी दत्ता काळे, गणेश वसंत काळे, राजू किसन काळे, महादेव संजय काळे, महादेव दादा काळे, हरि अर्जून काळे, धवन बापू पवार, युवराज बापू पवार, संतोष दत्ता काळे, गोविंद बाबू काळे , विष्णू दादा काळे यांचेसह 28 तरुण युवकांचा पक्षाच सदस्यत्व स्वीकारून भाजपमध्ये जाहिर प्रवेशात समावेश आहे.
यावेळी ता. सरचिटणीस संतोष सुपेकर, ता. व्यापारी अध्यक्ष चंद्रकांत गवळी, विधी आघाडी ता. अध्यक्ष ऍड संजय शाळू व शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, मुकुंद वाघमारे, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.