धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शहारातील मेघ मल्हार सभागृहात कलाविष्कार अकादमी धाराशिव द्वारा पर्व 11 वे साल नया गीत पुराणे या अविट गीतांची मैफिल मेलडी स्टार्सच्या हौशी छंदी गायकांची  उत्साहात संपन्न झाली.

प्रथम दिप प्रज्वलन संगीत विशारद आनंद समुद्रे, कलारसिक डॉ.अभय शहापुरकर, शंकरराव नळे, महारुद्र मोरे, मुख्यप्रवर्तक युवराज नळे, समन्वयक मुकुंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर 20 गायकांनी बहारदार गीतांचे गायन केले.गणेश वंदना रवींद्र कुलकर्णी, समन्वय मुकुंद पाटील आदींनी सुश्राव्य गायन केले. संगीत मैफिलीचे बहारदार सुत्र संचलन युवराज नळे यांनी केले. तर आभार शेषनाथ वाघ यांनी मानले. प्रतिवर्षी मैफिलीची मेजवानीचा अस्वाद धाराशिवकर रसिक मंडळी घेतला, तसेच याहीवर्षी संगीतप्रेमी रसिक श्रोत्यांची व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. रसिकांची सांगितिक सांस्कृतिक व साहित्यिक भूक भागवण्यासाठी व जिल्ह्यातील विविध प्रकारातील कलावंतांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी कलाविष्कार समूहाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.


 
Top