धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील पल्स हॉस्पिटल येथे दर्पण अर्थात पत्रकार दिनानिमित्त सोमवारी (दि.6) पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पत्रकारांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार करण्यात येणार आहेत.
धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि पल्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, 2 डी इकोसह हाडांची, डोळ्यांची तपासणी व विविध तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. पल्स हॉस्पिटल येथे सकाळी सात वाजता आरोग्य शिबिराला सुरुवात होईल. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार कैलास पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ होतो असे आवाहन धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, पल्स हॉस्पिटलचे डॉ.तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम यांनी केले आहे.