तुळजापूर (प्रतिनिधी)- दि.12 जानेवारी 2025 रोजी  स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालक मेळावाही आयोजित करण्यात आला होता. तसेच माजी यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार या कार्याक्रमात करण्यात आला. 

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूरचे प्राचार्य डॉ. एम.डी. गायकवाड ,जवाहर विदयालय तुळजापूरचे प्राचार्य इंगळे के.वाय व संस्थावस्थाना समितीचे प्रमुख बाबासाहेब पाटील, संस्थेचे प्राचार्य बिरादार एम. एस.उपस्थित होते.या कार्यक्रमाला मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी,माजी प्रशिक्षणार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पारितोषिक व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्राचे सुत्रसंचालन गायकवाड आर.टी.यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना पाटील व्ही. के.यांनी केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य बिरादार यांनी केले तर सौ दोडके एस एम मॅडम यांनी स्वामी विवेकानंदजी यांचा अल्प परिचय विदयार्थ्यांना करून दिला,सौ.तोडकरी एम.एस.यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी सौ दोडके एस एम, भोईटे,तसेच शिल्प निदेशक गायकवाड आर.टी.सौ शिंदे एस डी,मगर आर आर,क.नि.शिंदे पी आर,नाईकवाडे एस जे.सुत्रावे एस सी,शिंदे ए बी, चंदे ए एस,व सर्व कर्मचारी,कर्मचारी उपस्थित होते.


 
Top