धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या ध्येय-धोरणांनी प्रेरित होऊन उबाठा गटाचे युवा सेना मराठवाडा विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी ऊर्जावान प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे भव्य सत्कार करून त्यांचे अभिनंदनही केले.
या प्रसंगी नितीन काळे यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणाली, विकासविषयक दृष्टीकोन,आणि सर्वसमावेशक विचारसरणी याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पक्षात प्रवेश करणाऱ्या नव्या सदस्यांनी पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून समाजसेवेसाठी पुढाकार घ्यावा. देशाच्या आणि राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू असताना आपण पक्षप्रवेश करणे म्हणजे विकासाला पाठिंबा देणे असेच आहे.
यावेळी अक्षय ढोबळे व राणा बनसोडे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली भूमिका मांडताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या विचारसरणीमुळे ते या पक्षाशी जोडले गेले आहेत. देशाच्या आणि राज्याच्या तसेच धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय कोणताही पर्याय नसून आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या समवेत अहोरात्र काम करून त्यांनी धाराशिव जिल्ह्यात पक्षाचे बळ वाढवण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अभय आबा इंगळे, सुनील तात्या काकडे, राहुल काकडे, बापू पवार, अभिजित काकडे, दाजी पवार, अमोल राजेनिंबाळकर,विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, रमण जाधव, संदीप कोकाटे, अमोल पेठे, प्रवीण सिरसाठे, सचिन लोंढे, सुनील पंगुडवाले, रोहित देशमुख, प्रसाद मुंढे, चैतन्य माने, सागर दंडनाईक, नवनाथ सोलंकर, सूरज लोंढे, व्हटकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नव्या सदस्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.