सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या समाप्ती ला तीन महिने शिल्लक असताना साखरेच्या लोडिंग मध्ये लक्षणीय वाढ साधली आहे, मालवाहतुकीत झालेल्या या वाढीमुळे कृषी व्यापाराला चालना मिळत आहे.
साखरेच्या लोडिंग मध्ये वाढ झालेला तपशील :
वाढलेले रेक लोडिंग: विभागाने एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत साखरेचे १०८ रेक लोड केले.
महसुलात वाढ: साखर लोडिंगमधून आर्थिक वर्ष एप्रिल २०२४ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत जवळपास ७० कोटी रुपये मिळाले आहेत.
खाली दिलेल्या प्रमुख मालधक्क्याद्वारे सोलापूर विभागातुन साखर लोड केली जाते :
अरग, लातूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, ताज सुलतानपूर, तिलाटी, सोलापूर.
या मालधक्क्यावरुन आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड या राज्यांमधील विविध ठिकाणी साखर वाहतूक केली जाते. साखर मालवाहतुकीत वर दिलेली सोलापूर रेल्वे विभागातील स्थानके महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करतात आणि या आवश्यक वस्तूचे विस्तृत बाजारपेठेत वितरण करण्यास मदत करतात.
अश्या प्रकारची मालवाहतूकचे जाळे आणखी वाढवण्यासाठी सोलापूर विभाग कटिबद्ध आहे. साखर लोडिंगमध्ये झालेली हि वाढ सोलापूर विभागाच्या कार्यक्षम नियोजन, पायाभूत सुविधा आणि भागधारकांशी असणाऱ्या मजबूत समन्वयाचा पुरावा आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी सतत प्रयत्न करून, सोलापूर विभाग हा स्थानिक प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
तरी सोलापूर रेल्वे विभागाच्या अख्त्यारीत असणाऱ्या सर्व साखर कारखान्यांनी सोलापूर रेल्वे विभागाच्या साखर वाहतूक करणाऱ्या मालधक्क्याचा वापर करून,या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी केले आहे.