सोलापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 100 दिवसांच्या मोहिमेंतर्गत रामवाडी नागरी रेल्वे रुग्णालय व आरोग्य केंद्र (सोलापूर महानगपालिका) यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे विभागीय कार्यालय सोलापूर येथे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये प्रामुख्याने रक्त तपासणी, थुंकी तपासणी, क्ष किरण तपासणी आदी आरोग्याच्या विषयीच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि उपस्थित डॉक्टरांच्या सल्ल्याने निदान करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सोलापूर रेल्वे हॉस्पिटल चे मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
यावेळी सोलपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील यांनी आरोग्य तपासणी शिबिराच्या स्थळी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला . यावेळी बोलताना सोलापूर महानगपालिकेच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हरळकर यांनी 100 दिवसांच्या क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये सोलापूर रेल्वे विभागाचे असणारे उत्तम सहकार्य या गोष्टींना अधोरेखित केले. यावेळी शिबीर यशस्वी करण्यासाठी DMO डॉ विनोद, ANO श्रीमती सी व्ही साखरे यांच्यासह रामवाडी नागरी केंद्राचे कर्मचारी, एसटीएस गायकवाड, डॉ. शेंडगे ,रेल्वे रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग अधीक्षक श्रीमती एस बी ओकळी, आरोग्य परिचर श्री मोहसीन उपस्थित होते. अन्य मेडिकल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .