धाराशिव (प्रतिनिधी)- मुंबई येथे रूपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांना त्यांच्या कृषी, शैक्षणिक, बँकिंग ,विधी, सामाजिक, क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माझा या वृत्त वाहिनीने 'महाराष्ट्राचे अनमोल रत्न' या पुरस्काराने सन्मानित केले. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार गुंड यांनी सपत्नीक स्वीकारला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रीतील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

आपल्या दूरदर्शीपणाने रुपामाता उद्योगसमूहाला उच्च पूर्ण महाराष्ट्रभर पोचवणारे ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. रूपामाता उद्योगसमूहाने धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात कृषी, औद्योगिक, बँकिंग, दुग्ध व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले असून, युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. या पुरस्कारामुळे अधिकाधिक उद्योजकांना प्रेरणा मिळणार असून, जिल्हयातील उद्योगांना नवी ओळख मिळणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुंड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“हा पुरस्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण रूपामाता परिवार, शेतकरी, बँकेचे खातेदार, माझे हितचिंतक, सहकारी मित्र परिवार यांचा गौरव आहे. या सर्वांचा कायम ऋणि आहे” असे मनोगत गुंड यांनी यावेळी व्यक्त केले.

 
Top