तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगर परिषद कार्यालयाकडून बुधवारी दि. 22 जानेवारी तुळजापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मोहीमेत फक्त रस्त्यावर आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. काही फुटपाथ वरील अतिक्रमणे माञ जैसे थे होते. यात शहरातील मंदीर परिसर, भवानी रोड, महाद्वार रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात प्रचंड अतिक्रमणे वाढली होती ती काढली.
अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे .रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण पथक अतिक्रमण काढून पुढे जाताच पाठीमागे मंदीर महाव्दार समोरील उतरावर पुन्हा दुकाने थाटुन अतिक्रमण करणाऱ्यांनी व्यवसाय सुरु केल्याचे दिसुन आले.