तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याची पुरातत्व विभाग अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी अडीच तास पाहणी केली. यात अनेक बाबी उघडकीस आल्या. यात काही प्राचीन शीळेला तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागचे सहाय्यक संचालक वाहने व वास्तु विशारद आफळे मँडम, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, महंत तुकोजी बुवा  यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत उघड झाली. यानंतर श्रीतुळजाभवानी मंदीरातील मुख्य गाभारासह चोपदार दरवाजा, सिंह गाभारा व भवानी मंडप याचे स्ट्रँकचर आँडीट करुन त्याचा अहवाल आल्यानंतर मंदीर सुरक्षा संवर्धनासाठी काय करायाचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

श्रीतुळजाभवानी मातेचा गाभाऱ्यास पुरातन रुप प्राप्त होण्यासाठी मंदीर गाभाऱ्यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढुन टाकल्यानंतर काही शिळा खचल्या आहेत. तर काहींना तडे गेले आहेत असे दिसुन आले. मंदिरातील गाभाऱ्याचे जतन व संवर्धन म्हणजे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या निगराणी व मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गाभाऱ्यातील आतील भिंतीची फरशी काढुन टाकण्यात आली आहे. गाभाऱ्यातील काही शीळाना तडे गेले असुन या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट व तपासणी अहवाल आल्यानंतर त्या बदलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

श्रीतुळजाभवानी मंदीर 18 व्या शतका पुर्वीचे असल्याचे सांगितले जाते. यात 250 वर्ष या मंदीराचा कारभार निजाम पाहत होता असे समजते. त्यानंतर मंदीर नियोजन न करता अनेक दुरुस्ती कामे केले गेले. यामुळे मंदीर बांधकामावर लोड वाढला. लोड भिंतवर जाणे गरजेचे होते पण तो लोड मध्ये भागी आल्याने तडे जावुन चिरा पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. माञ पुरातन संपूर्ण मंदीर काम पाहणी नंतर स्ट्रँकचर आँडीट अहवाल आल्यानंतर नंतर या पुरातन भागाचे काय करायाचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीर मध्ये प्रथम मुख्य गाभारा नंतर चोपदार दरवाजा गर्भगृह नंतर सिंह गर्भगृह नंतर भवानी मंडप याचे स्ट्रँकचर आँडीट केले जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी जिथे चिरा पडल्यात तिथे लिक्विड भरुन चिरा बुजवण्या बाबतीत चर्चा झाली आहे. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचे स्ट्रक्चरल निअरिंग व रडार तंत्रज्ञानाचा गाभाऱ्याच्या कामाला वापर करून दगड आगामी 200 वर्ष मंदिराच्या कळसाचा भार सहन करू शकतील का याचा अहवाल पुरातत्व विभाग 8 दिवसात सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच महाद्वार बाबतही 8 दिवसात पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालय अहवाल देणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

 
Top