धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील विद्यार्थी पी.एन.जी. आणि सन्स झुर्पुझा आर्ट गॅलरी पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतराळ विषयावर चित्रकला स्पर्धेत 5वी ते 7वी गटात प्रथम क्रमांक पलाशा नलावडे,  8वी ते 10वी प्रथम सान्वी भोसले, द्वितीय प्रणव कांबळे यास प्रविण्य मिळाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुनील कोरडे, धनंजय देशमुख यांचे हस्ते पदक व प्रमाणपत्र दे ऊन सन्मानित केले. या प्रसंगी कलाध्याक शेषनाथ वाघ क्रीडाशिक्षक चंद्रकांत कवितकर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील शिक्षक शिक्षकेत्तर यांनी अभिनंदन केले.

 
Top