तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचा स्ञीशक्तीचा सन्मान करणारा जलयाञा सोहळ्याचे नावलौकिक श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाने जगभर पोहचवल्याचे प्रतिपादन महंत तुकोजी बुवा यांनी श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळा तर्फ काढण्यात आलेल्या दिनदर्शिकि प्रकाशन सोहळ्यात केले.
हाँटेल स्काँय लँन्ड मध्ये झालेल्या दिनदर्शिका सोहळ्याचे प्रकाशन प्रथम महंत तुकोजीबुवा सह पञकारांचा हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महंत म्हणाले कि मी प्रथम प्रक्षाळ पुजेसाठी म्हणले जाणारे पदे कवने दुरुस्ती केली. आज या दिनदर्शिकेतील पदे कवने घरी जरी राञी म्हणत गेलात तर प्रक्षाळपुजा सेवा केल्याचे समाधान लाभेल. भारतात महाराष्ट्रात 1972 लादुष्काळ पडला तेव्हा स्थानिक मंडळीनी शांकभरी देविला प्रसन्न करुन भरपूर पाऊस पाणी पडू दे व मुबलक पिक येवुन दुष्काळ सावट दूर करण्यासाठी हा शाकंभरी नवराञ उत्सव आरंभ केला. प्रथमता छोट्या रुपात होता. माझे मंदीरात महंत म्हणून दत्तक विधी होवुन देवीचरणी सेवेत रुजू झाल्यानंतर मी हा उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यासाठी श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाची स्थापना केली. नंतर वर्षानुवर्षे हा उत्सवाला प्रतिसाद मिळत गेल्यामुळे तो जगात नावलौकिक प्राप्त केले. यावेळी श्रीतुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, बाबासाहेब खपले, रत्नदीप मगर, रुषीकेश व-हाडे, विशाल वाघमारे, उमाकांत रणदिवे, अनंद सावंत आदी पदाधिकारी सह प्रक्षाळ मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.