धाराशिव (प्रतिनिधी)- शास्त्रज्ञ म्हणून डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचा नावलौकिक होताच, पण त्यांची सगळ्यात मौलिक कामगिरी म्हणजे शास्त्रज्ञ म्हणून देशाला आण्विक क्षेत्रात मजबूत करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. ए. झेड. पटेल यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. ए. झेड. पटेल, डॉ. उषा वडणे, प्रा. सुनीता गुंजाळ, डॉ. राजश्री यादव, प्रा. वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी प्रेरित केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रंथालयात भरवलेल्या पुस्तक प्रदर्शन आणि वाचन प्रेरणा दिनासाठी ग्रंथालय कर्मचारी सहाय्यक ग्रंथपाल बी. जी. सिरसट, डी. आर. जाधव, सविता नलावडे, सूक्ष्ममा टेकाळे, संभाजी धात्तुरे, हनुमंत सुरवसे आणि इंदुबाई कांबळे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजश्री यादव यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. वर्षा पाटील यांनी मानले.