धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व धाराशिव येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे के टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने, विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन धाराशिव जिल्हास्तरीय पुरुष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन के टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय धाराशिव यांनी आयोजन केले होते , सदरील स्पर्धा 01 जानेवारी 2025 रोजी फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूल च्या मैदानामध्ये खेळवल्या गेल्या यामध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने सहभाग नोंदवला‌ होता.

अंतिम सामना हा धाराशिव येथील के‌ टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय व व्यंकटेश महाविद्यालय धाराशिव या दोन संघांमध्ये झाला , प्रथम फलंदाजी करताना के टी पाटील कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयाने 8 ओव्हर मध्ये 71 रन्स चा डोंगर उभा केला व परिणामी व्यंकटेश महाविद्यालयाने 72 धावाचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ 51 धावसंख्येवर आटोपला व या रोमहर्षक सामन्यामध्ये के टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाने अंतिम सामना 20 धावाने जिंकून विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय पुरुष क्रिकेट स्पर्धेत सन 2024 - 25 चे विजेतेपद पटकावले आहे. व सदरील विजेता संघ विद्यापीठ स्तरीय क्रिकेट मॅचेस च्या सहभागासाठी छत्रपती संभाजी नगर येथे रवाना झाला आहे. या संपूर्ण स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे क्रिकेटचे सचिव उमाकांत सलगर, महाराष्ट्र राज्याचे खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ . चंद्रजीत जाधव , के टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजित मसलेकर व स्पर्धेचे समन्वयक इंद्रजीत वाले यांची उपस्थिती होती या मिळालेल्या यशाबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर  पाटील, सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील व प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील यांनी महाविद्यालयातील यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


 
Top