तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत बालक सभा बाल आनंद मेळावा,पालक मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासाहेब मगर, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, सरपंच दिदी काळे, केंद्र प्रमुख अनिल पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी बालकांचे व्यवहारी ज्ञान, बाजार हाट यातून पैशांची देवाणघेवाण यातून गणिती क्रिया आनंदाने स्वानुभवातून पक्के करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे प्रास्ताविकातून सांगितले. ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब .खोचरे यांनी बालसभेबद्दल माहिती दिली.उपसरपंच श्रीमंत फंड यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले .मालोजी वाघमारे यांनी शाळेत कार्यान्वित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पल्लवी पवार यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण व सद्यस्थिती या बाबत माहिती दिली. काशिनाथ नरसाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रतिभा जोगदंड, ज्योती गाढवे,किरण फंड, आशिष लोमटे यांनी परिश्रम घेतले.