तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय (ग्रामिण) अंतर्गत विविध रिक्त जागेचे ग्रहण लागले आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे 52 गावासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) कार्यालय कार्यान्वित करण्यात आलेले आहे.या कार्यालय अंतर्गत सात बिट असून ढोकी,खेड,कोंड बिटच्या पर्यवेक्षिकांची पदे रिक्त आहेत.तर अंगणवाडी कार्यकर्ती यांची तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत 5 अंगणवाडी कार्यकर्ती यांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये तेर (1), कोंबडवाडी (1), येवती (1), बावी ढोकी (1), टिकळी ढोकी (1) येथील पदे रिक्त आहेत.तर तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत 8 अंगणवाडी मदतनीस यांची पदे रिक्त आहेत.त्यामध्ये ढोकी (2), कोल्हेगाव (1), येडशी (2), का.तडवळा (1), पळसप (1), टाकळी ढोकी (1) येथील पदे रिक्त आहेत. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बदली झाली असल्याने या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार पर्यवेक्षिका मनिषा पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे.तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत विविध रिक्त पदे असल्याने कार्यरत पर्यवेक्षिका यांच्याकडे विविध बिटचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे पर्यवेक्षिका यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे.शासनाने रिक्त असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी मदतनीस यांच्या जागा ताबडतोब भरण्याची मागणी होत आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ग्रामीण) कार्यालय अंतर्गत बाल प्रकल्प अधिकारी, 3 पर्यवेक्षिका, 5 अंगणवाडी कार्यकर्ती, 8 अंगणवाडी मदतनीस यांची पदे रिक्त आहेत.
मनिषा पाटील, प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ग्रामीण) कार्यालय, तेर