कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील शिवभक्तांनी कळंब स्मशानभूमीत भगवान शंकराची मूर्ती (शिवमूर्ती) लोकसहभाग व लोकवाटा या माध्यमातून बसवण्यात येत असून यासाठी कळंब नगर परिषदेकडून परवानगी घेण्यात आली आहे. राजस्थान मधील किशनगड येथील शिल्पकार यांनी मकराना (मार्बल) पांढरा रंग पासून बनवली असून मूर्तीची उंची पाच फूट चार इंच इतकी आहे. मूर्ती साठी पाच फूट उंचीचा चबुतरा बांधण्यात करण्यात येत असून यासाठी कळंब नगर परिषदेने परवानगी दिली आहे. अशी माहिती शिवमूर्ती प्रतिष्ठापना समितीचे प्रकाश भडंगे यांनी दिली. यासाठीचा भूमिपूजन कार्यक्रम दिनांक 17 जानेवारी दुपारी 2 वाजता स्मशानभूमी कळंब येथे संपन्न झाला.
यासाठी विधिवत भूमिपूजन पूजा हरिभक्त परायण महादेव महाराज अडसूळ, ज्येष्ठ विधीज्ञ त्रिंबकराव मनगीरे यांच्या हस्ते करण्यात आली तर पुरोहित म्हणून विजय कुलकर्णी, हे होते याप्रसंगी मकरंद पाटील, अनिल यादव, अच्युतराव माने, संजय हाजगुडे, वीरेंद्र गुंजाळ, माधवसिंग राजपूत, संतोष भांडे, अशोक क्षीरसागर, परशुराम देशमाने, संतोष भोजने, अशोक चिंचकर,ईश्वर ताटे, पंकज गायकवाड, शंकर ताटे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवमूर्ती प्रतिष्ठापना समितीचे प्रकाश भडंगे यांनी तर आभार बंडू ताटे यांनी मांनले.