धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा 79 वा वाढदिवस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानशिदोरी दिन आणि रक्तदान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन ज्ञान शिदोरी दिन ग्रंथालयाच्या वतीने साजरा करण्यात आला तर वाढदिवसाचे औचित्य साधुन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. 79 रक्तदात्यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य जयसिंगराव देशमुख म्हणाले की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस दरवर्षी ज्ञान शिदोरी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्रंथ भेट देऊन हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे.त्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना गुरुदेव कार्यकर्त्याकडून एक ग्रंथ भेट देऊन त्याच्या ज्ञानाच्या कक्षा वाढाव्यात यासाठी ज्ञान शिदोरी दिन साजरा केला जातो. गरजू व्यक्तींना रक्तदानाचा उपयोग व्हावा यासाठी रक्तदान शिबिर महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतले जाते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top