तुळजापूर (प्रतिनिधी) - नगर परिषद तुळजापूर मार्फत बुधवार दि. 22 जानेवारी रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार असल्याने यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याचि मागणी नगरपरीषदने पोलिस खात्याला पञ देवुन केली आहे.
शहरातील भवानी रोड, महाद्वार रोड, आंबेडकर चौक, मेन रोड, खडकाळ गल्ली, कुंभार वाडा या परिसरात प्रचंड अतिक्रमणे असुन, येथे भाविकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. चाळीस फुटाचे रस्ते पंधरा वीस फुट राहिले आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी बुधवार दि. 22 जानेवारी रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याने नगरपरीषदने पोलिस खात्याकडे पोलिस बंदोबस्त मागणी पञ देवुन केली आहे.
अतिक्रमण काढतेवेळेस जातीय मतभेद तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नगरपरिषद तुळजापूर मार्फत अतिक्रमण काढतेवेळेस बंदोबस्तकरिता आपल्याकडे अधीनस्त असलेले 1 अधिकारी, 4 पुरुष पोलीस कर्मचारी, 4 महिला पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून अतिक्रमण मोहीम राबविणे सोईस्कर होईल. असे पञात म्हटले.