तुळजापूर (प्रतिनिधी) - जाणता राजा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्ताने सिंहासनाधिष्ठीत भव्य सुबक नव्याने तयार केलेल्या फायबर छञपती शिवाजी महाराज मुर्तीची प्रतिष्ठापना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते' मंगळवार दि. 18 फेब्रूवारी 2025 रोजी करण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्ताने अडीच फुटाच्या साडेचारशे शिवमुर्त्या वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पञकार परिषद घेवुन जाणता राजाचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुतवळ यांनी दिली.
येथील विठ्ठल मंदीरात झालेल्या पञकार परिषदेत कुतवळ पुढे म्हणाले कि, मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी आर्य चौकात छञपती शिवाजी महाराज मुर्ती प्रतिष्ठापनेसाठी उपमुखमंञी एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रराजे, छञपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे, धनंजय देसाई यांना आमंञित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच याच दिवशी घरोघर साडेचारशे शिवमुर्ती वाटप केली जाणार आहे. तसेच याच दिवशी शिवशाहीर सुरेश जाधव यांचा पोवड्याच्या कार्यक्रम ही आयोजित केला आहे. शिवजयंती दिनी 19 फेब्रुवारीला अभिवादन व 25 फेब्रुवारीला आरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. तसेच यंदा शिवजयंती निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणूकी ढोल तसेच लेझीम पथक असणार आहे. तसेच छञपती शिवाजी महाराज सोबत सुराज्य निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या मावळ्याचा इतिहास डीझीटल पोस्टर माध्यमातून मांडला जाणार आहे.