तुळजापूर (प्रतिनिधी)- विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विक्रमी बहुमताने विजय झाल्याबद्दल कोरेवाडी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीने तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंहजी पाटीलयांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या प्रश्नासंबंधी चर्चा करून त्या सोडवण्यासंबंधी राणादादा यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देण्यात आल्या.
यावेळी गोविंद हुलवानकर, आण्णा पाटील (पोलिस पाटील), शिवराम सलगर व्हाईस चेअरमन,वि.का.से.सह.सोसायटी कदमवाडी, पंडित सलगर, मदन देवकर, शहाजी शिंदे, कल्याण पाटील, भारत बनसोडे, साधु सलगर, दिलीप सलगर, मनोहर सलगर, मच्छिंद्र शिंदे, संदिप येलम,संदिप शिंदे,रवि सलगर, मनोज धायगुडे, अजित सलगर, गणेश झाडे इ. ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.