तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील नळदुर्ग रस्त्यावर शनिवारी राञी हरणाला अज्ञात वाहनाने उढवल्याने यात हरण ठार झाल्या घटना घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावर वळणाचा पुढे शनिवारी राञी हरण ज्वारी शेतातुन बाहेर येवुन रस्ता क्राँस करीत असताना अज्ञात वाहनाने त्यास ठोकरल्याने जबरदस्त मार लागल्यामुळे त्यात ते हरण मरण पावले. सकाळी ही घटना उघडकिस आली. वनविभागाचा पथकाने सकाळी घटनास्थळी येवुन ते हरण घेवुन आपसिंगा जंगलात नेवुन त्याचावर अंत्यसंस्कार केले. सध्या रबी पिक जोमात आल्याने त्यात ज्वारी खाण्यासाठी आले असताना रस्ता क्राँस करताना सदरील अपघात झाला त्यात ते मरण पावल्याचे समजते.