नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 19 जानेवारी रोजी पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 9 जोडपी विवाहबद्ध झाली. येथील बीके फंक्शन हॉलमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. 

नळदुर्ग येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इज्तेमाई शादियाँ( सामुदायिक विवाह) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 10 वर्षापासून मुस्लिम समाजासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे गोरगरीब गरजूवंत कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे. संस्थेच्या वतीने मागील 10 वर्षात 150 हून अधिक जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. रविवारच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या नववधूवरांना नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी 25 हजार रुपयांचे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. हजरत ख्वाजा शमशोद्दीन रहे. वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख सय्यद नादेरउल्ला हुसेनी व कपिल मौलवी यांच्या मार्गदर्शना खाली हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार,आलेम मोहम्मद रजा, हाफेज सय्यद नियामतूल्ला इनामदार,हाफेज फारुक शेख,हाफेज मुसा जमादार,हाफेज मुदस्सर कुरेशी,हाफेज शब्बीर अमिर साब काश्मिरी, हाफेज मुजफ्फर शेख,हाफेज शब्बीर अहेमद शेख, शहर काजी मैनोद्दीन काजी यांच्यासह शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पत्रकारिता व पोलीस प्रशासनातील मान्यवरांसह सर्व जाती धर्मातील नागरिक उपस्थित होते. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी व नळदुर्ग शहर मुस्लिम समाजाने परिश्रम घेतले.

 
Top