भूम (प्रतिनिधी)- आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन अशी ओळख असलेली 'टाटा मॅरेथॉन स्पर्धा दिं.19 जानेवारी रविवारी मुंबईत पार पडली. 2004 पासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनला आता वीस वर्षे झाली आहेत. या स्पर्धेत आशिया खंडातील अनेक देशांचे स्पर्धक सहभागी होत असतात. त्याप्रमाणे भूम तालुक्यातील ईडा येथील युवा शेतकरी भाऊसाहेब थोरात हे पण दरवर्षी सहभागी होत असतं. स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्यांना प्रेरणा पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुल मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं आहे. या स्पर्धेत विविध देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. या धावपट्टीवर आपणही धावून धावपट्टू व्हावे अशी जिद्द मनात ठेवून भूम तालुक्यातील मौजे ईडा येथील राहणारे भाऊसाहेब दिलिप थोरात व्यवसाय शेत, शिक्षण, मनात काहीतरी वेगळ करुन दाखवण्याची जिद्द असलेल्या या युवकाने स्पर्धेत मॅरेथॉन हौशी या श्रेणी मध्ये भाग घेत 42.6 अंतर 4758 या वेळेत पूर्ण करून ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली. याबद्दल त्यांना आयोजकांकडून मॅरेथॉन फिनिशर्स मेडल व प्रेरणा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा युवक गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट धावपट्टू होण्यासाठी कसरत करत आहे. अश्या या मोठ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ग्रामीण भागातील युवक सहभागी होऊन यशस्वी होण्याचे पाहत असल्याने या युवकाचे सर्वत्र तालुक्यात कौतुक होत आहे.