तुळजापूर (प्रतिनिधी) -धाराशिव जिल्हा पालकमंत्रीपदी देविभक्त मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर विकासाला चालना मिळेल असे बोलले जात आहे.
पालकमंञी प्रताप सरनाईक श्रीतुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त असुन ते सातत्याने वेळ मिळताच श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ सहकुंटुंब सह परिवार येतात. विधानसभा निवडणुक पुर्वी दोन महिने अगोदर तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन त्यांनी श्रीतुळजाभवानी मातेस सत्तर तोळे सुवर्ण मुकुट व सुवर्ण हार अर्पण केला होता. त्यानंतर ते विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताने विजयी झाले मंञी बनले. श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर अशा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्रीपदी नियुक्ती झाले. विशेष म्हणजे धाराशिव जिल्हयाच्या पालकमंञी पदी अनेक नावे चर्चत होते. पण अनपेक्षित पणे मंञी प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्हयाच्या पालकमंञी पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे शहरवासियांसह भाविकांमध्ये स्वागत होत आहे.
निस्सीम भक्ताची पालकमंञी पदी नियुक्ती !
धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्रीपदी श्रीतुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त मंञी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाल्याने आता मंदीरातील भष्ट्राचार, दर्शना बाबतीत भाविकांना केला जात असलेला भेदभाव दूर होवु भाविकांना सुलभ दर्शन मिळेल असा आशावाद भाविकांमधुन व्यक्त होत आहे.