धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय बुध्द धम्म परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणुन भीमराव यशवंतराव आंबेडकर हे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु धाराशिव येथे आले असता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित मोकळ्या जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली, फुले शाहु आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक गणेश रानबा वाघमारे यांनी भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे पंचशील पंजा व पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला व पेढे वाटप करण्यात आले.

गणेश रानबा वाघमारे यांनी समितीच्या जागेसंदर्भात व मौजे कसबे तडवळे येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा राज्य सरकारकडे रेंगाळलेल्या निधी विषयी चर्चा करुन निवेदन दिले,निवेदनात म्हटले की, धाराशिव नगरीत आपले स्वागत आहे.धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे. मौजे घाटंग्री परिसरात नव्यानेच उभे रहात असलेले तगर भुमी बुद्ध विहार हे धाराशिव जिल्ह्याला बौद्ध धम्माच्या नावाने ऐतिहासिक असे एक आगळे वेगळे रूप देईल. दि.22 फेब्रुवारी 1941 रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मौजे कसबे तडवळा येथील महार मांग वतन परिषदेच्या निमित्ताने लाभलेले या भूमीस चरणस्पर्श ही देखील ऐतिहासिक अशी घटना असुन या घटनेला उद्याच्या दि.22 फेब्रुवारी रोजी 84 वर्षे होत आहेत. मौजे कसबे तडवळ्याचे स्मारक मात्र निधी अभावी राज्य सरकार कडे अडकले आहे. तसेच धाराशिव येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील फुले शाहु आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेचा देखील प्रश्न प्रलंबित आहे.दोन्ही प्रकरणे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय भवन व ग्राम विकास विभाग मुंबई यांच्याकडे रेंगाळले आहे. दोन्ही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करावे ही विनंती अशा प्रकारचे लेखी निवेदन चर्चा करुन देण्यात आले.

यावेळी भीमराव यशवंतराव आंबेडकर, गणेश रानबा वाघमारे,अंकुश उबाळे,गुणवंत सोनवणे,पोपट सोनटक्के,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,संजय गजधने, प्रवीण जगताप,संग्राम बनसोडे,संपतराव शिंदे,रमेश कांबळे,अमोल लष्करे, स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,सिद्राम वाघमारे, श्रीकांत गायकवाड,अतुल लष्करे,सोमनाथ गायकवाड,मुकेश मोटे, राजाराम बनसोडे,विकी नाईकवाडी,रोहित शिंगाडे,संतोष वाघमारे,सह इतर उपस्थित होते.

 
Top