परंडा (प्रतिनिधी)- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांची दिशा या जिल्हास्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल परंडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजकुमार जैन,जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणी हावरे , राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष खय्यूम तुटके, राष्ट्रवादी दिव्या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओव्हाळ, तालुका उपाध्यक्ष नागनाथ थोरात, शहराध्यक्ष अजय बनसोडे, माजी नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, राष्ट्रवादी मीडिया प्रमुख गोरख देशमाने, ग्रा.पं.सदस्य कानिफनाथ सरपने, दीपक ओहाळ, समाधान ओहाळ, शंकर बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, रणजीत नागटिळक, योगेश बनसोडे,आतिक जिनेरी, नवाज बाडेवाले, गौरव बनसोडे, उमेश जाधव यांच्या सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top