कळंब (प्रतिनिधी)- अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या वतीने राज्यभरात 4 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.  यात कळंब शहर व परिसरात दि.  17 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता कळंब शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबिरात कळंब शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी व भाविकांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून रक्तदान करावे. असे आवाहन श्री संप्रदाय सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरासाठी कळंब तालुका सेवा समितीचे सचिव विठ्ठल काटे, राजेंद्र मुळीक, कल्याण बोराडे,जीवन चव्हाण, दत्तात्रेय इंगोले हे परिश्रम घेत आहेत.

 
Top