धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील शारदा विद्या निकेतन हायस्कूल, सारोळा बु. या शाळेतील 1993-94 च्या 10 वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक अद्वितीय उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या शाळेसाठी प्रवेशद्वार कमान बांधण्याचा संकल्प केला आहे.
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची ही संधी साधली आहे. “शाळेने आम्हाला शिक्षणासोबतच जीवन जगण्याच्या महत्त्वाच्या मूल्यांची शिकवण दिली. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही हे छोटंसं योगदान देत आहोत,” असे या बॅचच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन निधी संकलन, कामाचे नियोजन, आणि त्याची अंमलबजावणी करतील. कमान उभारणीचा उद्देश शाळेचा गौरव वृद्धिंगत करणे आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात शाळेच्या आठवणींना अजरामर ठेवणे आहे. शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाने या संकल्पनेचे स्वागत केले असून या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला एक नवा ओळख पटवणारा वारसा मिळेल, असे मत व्यक्त केले. शारदा विद्या निकेतन हायस्कूलसाठी विद्यार्थ्यांची ही अनोखी भेट भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, यात शंका नाही.
यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुरेशराव देवगिरे, साठे सर, रमेश रणदिवे,प्रशांत रणदिवे, श्रीनिवास रणदिवे, जयंत बाकले, रवीशंकर पिसे, सुरेश कठोर, सोमनाथ डोलारे,अनिल दांगट,नवनाथ गायकवाड, बाळासाहेब सुरवसे पाटील, चंद्रकांत मसे, दत्तात्रय जासूद, बाळासाहेब देडे,प्रविण चंदने, सौदागर कुदळे, मिलिंद कठारे, शंकर गाडे, बाळकृष्ण जडे, दिगंबर वाघमारे, बाळासाहेब चव्हाण, नामदेव खरे तसेच गावातील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.