धाराशिव (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक  दिनानिमित्त पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदार यांना मंत्री परिवहन,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यात धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यरत असलेले श्रीमती अश्विनी शामराव भोसले, महिला पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे  उमरगा, जाकेर निसार खॉन पठाण, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय धाराशिव, सुरेश बापुराव कासुळे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सायबर, अमोल सुभाष मोरे, सहा. पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस हवालदार  रवि बळीराम भागवत पोलीस ठाण तुळजापूर, पोलीस हवालदार नितीन पोतदार, बिदे, जिल्हा विशेष शाखा धाराशिव, शिवा दहीहांडे पोलीस मुख्यालय धाराशिव, श्रीमती प्रज्ञा क्षिरसागर महिला पोलीस नाईक, पोलीस ठाणे ढोकी यांचा समावेश आहे.

पोलीस खात्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिम्मीत त्यांना परिवहनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.  सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, इतर मान्यवर उपस्थ्तीित होते.

 
Top